बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन्यथा मनोहर पर्रिकरांचं श्राद्ध घाला; काँग्रेस प्रवक्त्याची धक्कादायक मागणी

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे अत्यवस्थ आहेत. मात्र यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. 

मुख्यमंत्री हयात असतील तर आम्हाला त्यांना पहायचं आहे, अन्यथा त्यांचं श्राद्ध घालून टाका, अशी मागणी देशप्रभू यांनी केली आहे. 

मनोहर पर्रिकर यांची प्रकृती हा खरंच चिंतेचा विषय आहे. सार्वजनिक अथवा खासगीतही ते कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत आमच्या मनात खरंच शंका आहे, असं त्यांनी म्हटलंय. 

दरम्यान, मुख्यमंत्री हयात असतील तर जनतेसाठी त्यांचा किमान एक व्हीडिओ तरी प्रसिद्ध करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-युतीसाठी आग्रह धरणे म्हणजे लाचारी नव्हे तर मित्रत्व- रावसाहेब दानवे

-गुडन्यूज!!! सानिया आणि शोएबच्या घरी ‘बेबी मिर्झा-मलिक’चं आगमन

-वल्लभभाईंना तरी कसे पटेल?; राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

-पक्षाला खूश करण्यासाठी शिवसेनेची माकडं बोलतात; मात्र याद राखा!

-राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंचा साडी नेसवलेला प्रतिकात्मक पुतळा जाळला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More