पाटणा | लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान आहे, त्यांचे पुत्र चिराग पासवान यांचे वर्तन संशयास्पद आहे, असा आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या पक्षाने केला आहे.
हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते दानिश रिजवान यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. दानिश यांनी मोदींकडे रामविलास पासवान यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रुग्णालयात उपचार सुरु असताना पासवान यांच्या भेटीची केवळ तिघांनाच परवानगी का होती? रामविलास पासवान यांच्या मृत्यूमागे चिराग पासवान यांनी कट रचला आहे, त्यांची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप दानिश रिजवान यांनी केला.
दरम्यान, रामविलास पासवान यांच्या निधनावर बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
महत्वाच्या बातम्या-
उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त; रूग्णालयातून सोडलं घरी
अकरावी प्रवेश प्रकरणी राज ठाकरे यांचा वर्षा गायकवाड यांना फोन
“या जगात 2 व्यक्तींना शोधणं अशक्य, पहिला मोदींचा क्लासमेट अन् दुसरा…”
गरज भासली तर भाजपला देखील पाठिंबा देऊ; मायावती यांचं मोठ विधान
कोचिंग क्लासेस सुरु करा; क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंची घेणार भेट