बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सब्यसाची यांच्या मंगळसूत्राच्या नवीन जाहिरातीवरून वाद; नेटकरी संतापले

मुंबई | गेल्या काही वर्षापासून जाहिरातीमधील वाद प्रकर्षाने समोर येताना दिसत आहे. तनिष्का आणि झोमॅटो यांच्यासारख्या जाहिरातींना नेटकऱ्यांनी आधीही ट्रोल केलं आहे. अशातच आता प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांच्या नवीन जाहिरातीमुळे नवा वाद रंगताना दिसत आहे.

सब्यसाची मुखर्जी यांच्या मंगळसूत्र लक्झरी लेबलने ‘रॉयल बंगाल मंगळसूत्र इंटिमेट फाइन ज्वेलरी कलेक्शन’ने एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवरून नवा वाद सुरू झाल्याचं दिसतंय. या फोटात त्यांच्या प्रोटक्सची नवीन डिसाईन दाखवण्यात आली आहे. sabyasachiofficial या ऑफिशिअल अकाऊंटवरून ही जाहिरात दाखवण्यात आली. त्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सब्यसाची यांच्या जाहिरातीमध्ये मंगळसूत्र आणि ब्रा घातलेली एक महिला दिसत आहे. त्यातचसोबत त्याठिकाणी एक पुरूष देखील जाहिरातीमध्ये दाखवण्यात आला आहे. ‘द रॉयल बंगाल मंगळसूत्र’ असं या चित्राला कॅप्शन देखील देण्यात आलं आहे. त्यावरून नेटकरी संतापल्याचं पहायला मिळतंय. हा हिंदू धर्माचा अपमान असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मंगळसूत्र हा एक पवित्र दागिना आहे. हिंदू धर्मातील स्त्रिया हा दागिना घालतात. त्यामुळे अशा अश्लिल जाहिरातींवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी नेटकरी करताना दिसत आहे. तर याविरूद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचं देखील काहींनी म्हटलं आहे. याआधी देखील दिवाळीच्यावेळी सब्यसाची मुखर्जी यांच्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला होता.

पाहा पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Sabyasachi (@sabyasachiofficial)

थोडक्यात बातम्या-

“दाऊद तर पाकिस्तानात आहे, मग तो इकडे कसा येऊ शकतो”

‘तुषार भोसले माफी मागा नाहीतर…’; ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक

‘एक बाप म्हणून मी खूप…’; आर्यन खानच्या जामिनानंतर आर. माधवनचं ट्विट

अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; दिवाळीआधी प्रवाशांना मोठा दिलासा

“मोहम्मद आमीरची इतकी औकात नाही की, मी त्याच्याबद्दल बोलावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More