मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनाच्या परिस्थितीत सर्वात जास्त खबरदारी घेताना दिसले आहे. मात्र त्यांना कोरोनाची लक्षणं दिसतं असल्यामुळे त्यांनी क्वारंटाइन होणाच्या निर्णय घेतला आहे.
कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्यावर तातडीने अजित पवार यांनी कोरोनाची तपासणी करुन घेतली. परंतु त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. पण त्यांना थोडी सर्दी ताप असल्यामुळे त्यांनी स्वत होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे खबरदारी म्हणून अजित पावारांनी त्यांची पुढील काही दिवसांचे कार्यक्रम आणि कामकाज हे रद्द केलं आहे.
दरम्यान, अजित पवारांची प्रकृती बरी नससल्याने आज होणारी मंत्रीमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
दिलासादायक! सलग तिसऱ्या दिवशी देशभरात 60 हजारांहून कमी रूग्णांची नोंद
अटक कोणाला करावी हे विचाराणं यालाच शोधपत्रकारिता म्हणतात का?; हायकोर्टाचा सवाल
एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नाही, तर उजेडात होईल- जयंत पाटील
“पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर आम्हाला आनंदच आहे”
चेन्नईला ‘सुपर’ धक्का; ‘या’ अष्टपैलू खेळाडूची आयपीएलमधून माघार