बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनापासून वाचण्यासाठी काय खावं, काय खाऊ नये?, अत्यंत महत्त्वाची माहिती

कोरोनाचं थैमान पुन्हा सुरु झाल्यानं नागरिकांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कोरोनाचं नवं रुप जास्त खतरनाक असून थोडीशी चुकीही महागात पडून कोरोना होण्याची शक्यता असते. वारंवार हात धुत राहणं, मास्क लावणं यासोबतच खाण्यापिण्याच्या गोष्टींकडेही लक्ष देण्याची गरज आहे. या काळात आपण असं जेवण घेतलं पाहिजे की जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल आणि गंभीर आजारांपासून आपल्याला वाचवेल. आहारासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना , ज्यामुळे आपला कोरोनापासून बचाव होऊ शकतो.

कोरोनापासून वाचण्यासाठी आपला आहार कसा असला पाहिजे?-

आपल्याला आपल्या जेवणात वेगवेगळ्या प्रकारची ताजी फळं आणि ताज्या अन्नाचा समावेश ठेवायला हवा. ज्या अन्नपदार्थांमधून आपल्याला विटामीन, मिनरल्स, फायबर, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडेंट मिळतील, अशा गोष्टी आहारात असायला हव्यात.

भरपूर प्रकारची फळं, भाज्या, डाळी, बीयांसारखी फळं, प्रोसेस न केलेला मका, बाजरी, ओट्स, गहू, ब्राऊन राईस, मुळांना लागणाऱ्या भाज्या जसे की बटाटा, गाजर, बीट तसेच मुळा यासारखी कंदमुळं, याशिवाय मांस, मासे, अंडी आणि दूध अशा गोष्टींचा आहारात समावेश असायला हवा.

प्रमाण कसं असावं?-

प्रत्येक दिवशी कमीत कमी दोन-चार ताजी फळं, किमान दोन ताज्या भाज्या, 180 ग्रॅम धान्य आणि शक्य असेल तर 160 ग्रॅम मांस खायला हवं. आठवड्यातून एक दोनदा रेड मीट आणि दोन तीन वेळा चिकन खाऊ शकता. संध्याकाळी भूक लागली तर कच्च्या भाज्या किंवा ताजी फळं खा. भाज्यांना जास्त उकळून खाऊ नका नाहीतर त्यातील महत्त्वाची पोषकद्रव्यं निघून जातील. हवाबंद अन्न खात असाल तर लक्ष द्या की त्यात साखर तसेच मिठाचं प्रमाण जास्त नसावं.

शरीरातील पाण्यावर लक्ष ठेवा-

आपल्या शरीरासाठी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. रक्तासाठी तसेच शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. याशिवाय शरीरातील विषारी गोष्टी बाहेर फेकण्याचं महत्त्वाचं काम देखील पाणीच करतं. त्यामुळे प्रत्येकानं प्रत्येक दिवशी कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं.

पाण्याशिवाय इतर काही गोष्टी देखील शरीरातील पाण्याचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करत असतात. यामध्ये पाण्याशिवाय आपण फळांचा ज्यूस सुद्धा घेऊ शकतो. याशिवाय लिंबू पाणी घेतल्यास उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला आणखी फायदा होऊ शकतो. काही गोष्टी मात्र आपल्याला प्रयत्नपूर्वक दूर करायला हव्यात. यामध्ये चहा, कॉफी तसेच सॉफ्ट ड्रिंक तसेच सोडा यांचा वापर कमी करायला हवा.

बाहेरच्या जेवणापासून दोन हात दूर राहा- 

एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोना होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे बाहेर जाऊन जेवण करणं टाळा. सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यानं हॉटेल तसेच रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवायला अनेक भागांमध्ये बंदी आहे. मात्र घरी पार्सल मागवायची सुविधा सुरु आहे, त्यामुळे आपल्या आहारावर लक्ष न देता फास्ट फूड तसेच इतर पदार्थ बाहेरुन मागवायचं प्रमाण वाढलं आहे, मात्र रोजरोज बाहेरचं खाणं चांगलं नाही. सकस आहार न मिळाल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती बिघडू शकते, त्यामुळे या कठीण काळात घरचंच खाणं पसंत करा.

या गोष्टींपासून दूर राहा- लठ्ठपणा, हृदयरोग, डायबिटीज तसेच कॅन्सरसारख्या भयंकर आजारांपासून दूर राहण्यासाठी साखर, फॅट्स असलेल्या गोष्टी तसेच जास्त प्रमाणात मीठ खाणं बंद करा. चहा तसेच कॉफीतून तुमच्या पोटात जाणारी साखर देखील तुमच्यासाठी काळजीचं कारण बनू शकते.

शक्य असेल तेवढं ट्रान्स फॅट्सपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड, स्नॅक्स फूड, फ्राईड फूड, फ्रोजन पिझ्झा, कुकीज तसेच क्रीम या गोष्टींमध्ये ट्रान्स फॅट्स असलेल्या पहायला मिळतात. कोणत्याही प्रकाराच्या दुसऱ्या आजारात कोरोना झाल्यास त्रास जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.

पोषक आहार तसेच योग्य हाईड्रेशनच्या मदतीने आपण आपलं आरोग्य तसेच आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली बनवू शकतो. मात्र तरी देखील ही काही जादू नाही त्यामुळे जे लोक पहिल्यापासून आजारी आहेत किंवा ज्यांना कोरोना झाला आहे त्यांनी आपल्या मानसिक आरोग्याची देखील काळजी घ्यायला हवी. कारण शारीरिकसोबत आपण मानसिक पातळीवरही या आजारासोबत लढत असतो.

थोडक्यात बातम्या-

“100 कोटीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्यांना माफी नाही”

सुपर कोहलीचा राहुल त्रिपाठीने घेतला अफलातून झेल, पाहा व्हिडीओ

डोक्यात कुऱ्हाड घालून वहिनीने नणंदेची केली हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल घक्का

आशा आहे 2 मेपर्यंत पाय ठीक होईल, निदान राजीनामा देण्यासाठी तरी चालत जाता येईल- अमित शहा

‘कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी…’; शरद पवारांनी केलं ‘हे’ आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More