बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला, ‘या’ सरकारी रुग्णालयात घेत आहेत कोरोनावरील उपचार

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांना काही महिन्यांपूर्वी मला कोरोनाची लागण झाल्यास सरकारी रुग्णालयात दाखल करा, अशी विनंती केली होती. त्यानुसार फडणवीसांना सरकारी रुग्णालयातच दाखल करण्यात आलंय.

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मी स्वतःला विलग करुन घेतले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलंय.

दरम्यान, मला कोरोनाची लागण झाल्यास सरकारी रुग्णालयात दाखल करा, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजन यांना जुलै महिन्यात केली होती.

महत्वाच्या बातम्या-

मी आता टेन्शन फ्री, इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार- एकनाथ खडसे

महिलेने वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून लगावली कानशिलात; व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हे वर्ष आमचं नव्हतंच, संघाला नशिबाची साथ देखील मिळाली नाही- धोनी

जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही- मेहबुबा मुफ्ती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More