मुंबई | कृषी कायद्याबाबत राज्यातील महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी आहे. या कायद्याविरोधात देशात एक अराजकाचे वातावरण तयार करायचे म्हणून ही परिस्थिती निर्माण केली गेली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. शेती सुधारणा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात होते. ज्या सुधारणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात झाल्या, त्या आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचं चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंसोबत मनसेच्या 50 पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक!
“संसदेत कृषी कायदा मांडला तेव्हा शिवसेना तटस्थ, मग आता विरोध कसा?”
7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्वाचा आहे- बच्चू कडू
बच्चू कडूंनी केलेली मदत ‘तो’ विसरला नाही; न सांगताच केलं कौतुकास्पद काम!
अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका!