बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…हे त्यांना रिअलाईज झालं असेल’; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई | औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच्या युतीबाबत सूचक वक्तव्य केलं. भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर उपस्थित आजी, माजी आणि भविष्यात एकत्र आलो तर माझे भावी सहकारी, असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना- भाजपची पुन्हा युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर आता त्यांचे माजी सहकारी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मनातील भावना बोलून दाखवली असेल, असं फडणवीस म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

आजच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे की मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं असेल, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत, हे त्यांना रिअलाईज झालं असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण सध्याची परिस्थिती तशी नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत. जनतेच्या अपेक्षा घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत. आम्ही सत्तेकडे डोळे लाऊन बसलेलो नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

चंद्रकांत पाटील तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं माझ्या कानावर आलंय- उद्धव ठाकरे

मनोज पाटीलनं केलेल्या गंभीर आरोपानंतर अभिनेता साहिल खानला अटक!

‘माझे भावी सहकारी…’; भाजपसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

पंतप्रधान मोदींमुळे रांगेतील शेवटच्या व्यक्तीचं कल्याण झालं- चंद्रकांत पाटील

भररस्त्यात डान्स केल्यामुळे माॅडेलवर गुन्हा दाखल, पाहा व्हिडीओ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More