नाशिक महाराष्ट्र

‘या’ महिला आमदार म्हणतात… शरद पवार हेच आमचे कप्तान!

सटाणा | शरद पवार हेच आमचे कप्तान आहेत. त्यांनी जनतेच्या हृदयात विचार पेरले आहेत. आम्ही शेतकरी एकदा पीक आलं नाही म्हणून जमिन कसणं सोडत नाही, असं म्हणत बागलाणच्या राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी आपल्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

जहाज बुडायला लागल्याची शंका आली की उंदरं लगेच उड्या मारतात. पण आपल्या जहाजाच्या कप्तानाने अश्या कित्येक संकटातून नौका लीलया पार केली आहे. आज भलेही हात थरथरत असतील मात्र अनुभव दांडगा आहे, असं म्हणत पवार हेच आपले नेते असल्याचं चव्हाण यांनी अधोरेखित केलं आहे.

पानगळ झाल्यावर झाडाला नवी पालवी फुटते, तसं पक्षात तरूणांना संधी नक्की मिळेल, असंही चव्हाण म्हणाल्या.

दरम्यान, कोणत्याही दबावाला बळी न पडता आपण पक्षातच राहणार असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पक्ष सोडलेल्यांना नेत्यांना दणका देण्यासाठी पवारांचा ‘पॉवर प्लॅन’

-“राष्ट्रवादी युवकमध्ये एकलव्य आहेत; साहेबांसाठी अंगठाच काय देहसुद्धा देऊ”

-काय उत्तम रित्या परतफेड केलीत; पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना आव्हाडांची चपराक

-‘हा’ आमदार म्हणतो काहीही होऊदे मी मात्र पवारांसोबतच!

-शरद पवारांकडून मोठा गौप्यस्फोट; मुख्यमंत्र्यांवर केले ‘हे’ गंभीर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या