Top News तंत्रज्ञान देश

ग्राहकांचा प्रतिसाद न मिळाल्यानं भारताच ‘हे’ मॅसेजिंग अ‍ॅप कायमचं होणार बंद

नवी दिल्ली |  सध्या सोशल मीडियाच्या जगतात अनेक मॅसेजिंग अॅप आले आहेत. तरीही भारतीय नागरिक मेड इन इंडिया सोशल मीडिया अ‍ॅप्सची मागणी करत असले तरी, सत्य मात्र वेगळेच आहे. भारतीय नागरिक स्वत: मेड इन इंडिया सोशल मीडियाच्या अ‍ॅप्सला पसंती देत नाही.

याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारतात तयार करण्यात आलेल्या या सोशल मीडिया अ‍ॅप्सला आपल्या भारतीयांनीच पसंती न दिल्याने अवघ्या दोन वर्षाच्या आत हाईक बंद पडलं आहे. ही माहिती माहिती स्वत: हाईकचे संस्थापक आणि सीईओ भारती मित्तल यांनी दिली आहे. तसंच या अॅपला हाईक स्टिकर्स अॅप या नावानेही ओळखलं जायचं.

मित्तल यांनी ट्विट करत सांगितलं की, ‘हाईकला बंद करण्याची वेळ आली असून, जानेवारी 2021 मध्ये हाईकची सेवा पुर्णत: बंद करण्यात येईल. मात्र हाईकमोजी ही सेवा ग्राहकांसाठी सुरुच राहणार आहे.

हाईक 2019 मध्ये लॉन्च झाला होता. सुरुवातीला हाईकला लाखो जणांनी पसंती दिली होती. प्रत्येक जण दिवसातून किमान 35 मिनीट हाईकचा वापर करायचा. मात्र कंपनीला जी अपेक्षा होती तसा प्रतिसाद ग्राहकांकडून न मिळाल्यानं हाईक बंद करण्यात येत असल्याचं मित्तल यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

पाकिस्तानला हवी भारतीय लस; पुण्यातील सीरमच्या लसीसाठी प्रयत्न सुरु!

उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया- शरद पवार

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर 38 जणांचा लैंगिक अत्याचार

परळीतील विजयानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

कारभारी लयभारी!; …म्हणून पत्नीनं आपल्या पतीला थेट खांद्यावर उचलून घेतलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या