बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ! पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई | अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी गंभीर आरोप होत आहेत. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा मुंबईसत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. याप्रकरणी मुंबईसत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.

ईडीकडून एकनाथ खडसे यांच्या कथित भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. मुंबईसत्र न्यायालयाने एकनाथ खडसे यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मंदाकिनी खडसे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु, न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळला आहे.

कर्ते करविते कोण आहेत आणि भोगायला कोणाला लागतयं. एकनाथ खडसे यांनी जे काम केले आहे त्याचे परिणाम जावई आणि पत्नीला भोगावे लागत आहेत, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी म्हटलं आहे. तसेच यातून नक्कीच मार्ग निघेल. थोड्याचं दिवसात भ्रष्टाचार समोर येईलं. सत्य लवकरच समोर येईल, असंही अंजनी दमानिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, एकनाथ खडसे यांची सर्जरी झाली असून ते बॉम्बे रूग्णालयात भर्ती आहेत. याबाबत रूग्णालयात असल्यामुळे एकनाथ खडसेंना न्यायालयात हजर राहता आलं नाही, असं एकनाथ खडसे यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले आहे. खडसेंच्या वकिलाने न्यायालयात हजर राहण्यासाठी वेळ मागितला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“शाहरुख खानच्या मुलाला सोडून द्या, मी पण गांजा घेतला होता”

“भैय्या दवाखान्यात जाऊनसनी काय करू?, मेलो तरी चालेल पण मागं हटायचं नाय”

”जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ शब्द कोणी खेचू शकत नाही’; पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला

“…तर मोठी किंमत मोजावी लागेल”; मेहबूबा मुफ्तींचा मोदींना थेट इशारा

रामदास कदमांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण नाही?; अरविंद सावंतांचं मोठं वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More