ex minister - माजी महिला राज्यमंत्र्याला सासरच्यांकडून जाळून मारण्याचा प्रयत्न!
- देश

माजी महिला राज्यमंत्र्याला सासरच्यांकडून जाळून मारण्याचा प्रयत्न!

लखनऊ | माजी महिला राज्यमंत्र्याला सासरच्यांकडून जाळून मारण्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्‍ह्यातील विठुआ कला येथे घडला आहे.  संगीता यादव असं या माजी राज्यमंत्र्यांचं नाव आहे.

संगीता यादव खोलीत झोपलेल्‍या असताना त्‍यांचे हातपाय बांधण्‍यात आले व नंतर त्‍यांच्‍यावर रॉकेल ओतून त्‍यांना पेटवण्‍यात आले यामध्ये त्या गंभीर स्थितीत असून त्यांना उपचारासाठी वाराणसी येथे हलवण्‍यात आले असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या प्रकरणी याबाबत पोलिसांनी संगीता यादव यांच्या सास-यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांना आमदार नितेश राणेंचा पाठिंबा

आता मोदी सरकारची लाज वाटतेय; राहुल गांधींचा हल्लाबोल

-शिवसेनेच्या मदतीमुळेच जळगाव महापालिकेत भाजपच्या महापौर

-हिंदू राष्ट्र झाले तर देशाच्या चिरफाळ्या उडतील!

-…म्हणून पुणे महापालिकेत विरोधक चक्क हेल्मेट घालून बसले!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा