बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मालाड येथे प्लायवूड आणि लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग

मुंबई | मालाड पूर्व येथे पठाणवाडी परिसरात अंबिका हॉटेलच्या समोर एका प्लायवूड आणि लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. ही आग जवळपास सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास लागली आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे सात बंब आणि चार मोठे पाण्याचे टँकर दाखल झाले आहेत. तसेच रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली आहे. आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मालाड पूर्व येथील पठाणवाडी परिसरातील त्रिवेणी नगरमध्ये प्लायवूड आणि लाकडाच्या गोडाऊनला आग लागली आहे. जवळपास 7 ते 8 हजार चौरसफुटाचे तळमजला आणि पहिला मजला असं हे गोडाऊन आहे.

दरम्यान, प्लायवूडचे गोडाऊन असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. धुराचे लोट देखील परिसरात पसरले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“सरकारनं पुढे येऊन चर्चा करावी, मी मदत करण्यास तयार”

राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंना विधान परिषदेवर संधी!

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द; या 12 नावांचा समावेश

अर्णब गोस्वामींना दिलासा नाही; आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार!

…म्हणून भाजप आमदार महेश लांडगेंना थेट अजितदादांनाच करावी लागली विनंती!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More