नवी दिल्ली | देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवरून राजकारण चांगलचं तापलं आहे. त्यातच आता पंजाब विधानसभा निवडणुकीवरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विविध मुद्यांवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राजकारण्यांना मिठी मारून किंवा आमंत्रण नसतानाही बिर्याणी खायला जाऊन संबंध सुधारत नाहीत. भाजप सरकार परराष्ट्र धोरणात सपशेल अपयशी ठरलं आहे, अशी जोरदार टीका डॉ. मनमोहन सिंग यांनी केली आहे.
मनमोहन सिंग यांनी महागाई, रोजगार, परराष्ट्र धोरण, केंद्र सरकारचे आर्थिक धोरण, कोरोना महामारी या मुद्यांवरून केंद्र सरकारला घेरलं आहे. भाजप सरकारला आर्थिक धोरणाचे कोणतेही आकलन नाही. हे सरकार फक्त देशातच नाही तर परराष्ट्र धोरणातही अपयशी ठरलं आहे, असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.
भाजप सरकारच्या कार्यकाळामध्ये गरिब लोक अधिक गरिब होत आहेत आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत आहेत. या सरकारचा राष्ट्रवाद जितका खोटा आहे तितकाच पोकळ आहे. इंग्रजांची ‘फोडा आणि राज्य करा’ ही रणनीती भाजप वापरत आहे. केंद्र सरकारकडून सातत्याने संविधानिक संस्था कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोना काळातील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त आहे, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे.
दरम्यान, देश आज काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या कामांना आठवत आहे. माझ्यावर कमकुवत पंतप्रधान असल्याचा आरोप करणाऱ्या भाजप आणि त्यांच्या बी आणि सी टीमचा प्रचार उघड झाला आहे, असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षभरापासून चिनी सैनिक भारताच्या पवित्र भूमीवर बसलेले आहेत. देश आर्थिक मंदीमध्ये फसलेला आहे. देशात मोठ्या प्रमाणात सामाजिक विषमता वाढत आहे, असा घणाघात मनमोहन सिंग यांनी केला आहे.
पाहा व्हिडिओ-
पंजाब की जनता के नाम पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी का संदेश। pic.twitter.com/EYkPWZObo2
— Congress (@INCIndia) February 17, 2022
थोडक्यात बातम्या-
रशिया-युक्रेनवर युद्धाचे ढग; युद्ध झालं तर भारताला चुकवावी लागेल ही किंमत
“सोमय्या स्वत:च्या चपलेनं स्वत:लाच मारणार, लोक त्यांची कपडे काढून धिंड काढणार”
“…तेव्हा मी आवर्जून देवेंद्रजींकडून डोसे बनवून घेतले”
“बायको हट्टला पेटली तर नवऱ्याने 3 दिवस तिच्यासोबत झोपू नये”
“किरीट सोमय्या म्हणजे राजकारणातील शक्ती कपूर”
Comments are closed.