बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून गडकरींनी आपल्या सासऱ्यांच्याच घरावर चालवला बुलडोझर; कार्यक्रमात सांगितला ‘तो’ खास किस्सा

मुंबई | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे केंद्र सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. मागील काही वर्षात त्यांनी अनेक प्रकल्प पूर्ण देखील करून घेतले आहेत. त्यातच आता एका कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांनी केलेल्या एका वक्तव्याने नितीन गडकरी पुन्हा चर्चेत आले आहेत.

हरियाणा पाहणी केल्यानंतर राजस्थानचा दौरा केला. हरियाणाच्या सोहनामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी एक गौप्यस्फोट केला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नानंतरचा किस्सा सांगितला.

माझं नुकतंच लग्न झालं होतं तेव्हा वेळी रामटेकमध्ये रस्ते बांधकाम सुरु होतं. हे काम सुरू असताना माझ्या सासऱ्यांचं घर रस्त्याच्या मधोमध येत होतं. यावेळी माझ्या पत्नीला कोणतीही कल्पना न देता सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवला आणि अखेर तो रस्ता पूर्ण केला, असा किस्सा नितीन गडकरी यांनी त्यावेळी सांगितला.

दरम्यान, मी प्रत्येक कामाचं निरीक्षण करतो. काम चांगलंच झालं पाहिजे आणि रस्त्याची गुणवत्ता चांगली असावी, यासाठी मी नेहमी आग्रही असतो. गुणवत्ता चांगली नसेल तर कंत्राटदाराला ठोकण्यासही आम्ही कमी करत नाही, असंही गडकरी यावेळी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

महाविकास आघाडी सरकार पडणार? चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी! भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा रद्द; आलं ‘हे’ मोठं कारण समोर

पोस्ट ऑफिसमध्ये ‘हे’ खातं असेल तर मिळेल 2 लाखांचा फायदा!

पुरुषोत्तम खेडेकरांच्या युतीच्या भूमिकेवर भाजपकडून मोठी प्रतिक्रिया!

‘बिग बाॅस मराठी 3’ मध्ये झळकणार हे कलाकार?, संभाव्य नावं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More