बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे

अहमदनगर | कोपर्डीत अत्याचार झालेल्या पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीराजे शनिवारी कोपर्डीत आले होते. यावेळी संभाजीराजेंनी कोपर्डी पीडितेच्या स्मारकावर जाऊन तिला अभिवादन केलं. तसेच पीडित कुटुंबाशी चर्चा केली. यावेळी कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. सरकारने या खटल्यासाठी विशेष बेंच स्थापन करून खटला फास्ट ट्रॅकवर खटला चालवावा आणि लवकरात लवकर पीडितेला न्याय द्या, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.

मी पीडितेच्या घरातील आई-वडिलांशी बोललो आहे. पीडित कुटूंबाला अजूनही न्याय मिळत नाही. मेरीटवर तुम्ही उच्च न्यायालयामध्ये ताबोडतोब अर्ज करावा. अर्जात स्पेशल बेंचच्या माध्यमातून ताबडतोब 6 महिन्यांत त्याचा निकाल यावा, अशी सरकारला माझी विनंती आहे. हा विषय उच्च न्यायालयात आहे. मी त्यावर मार्ग सांगेल. त्यावर अंमलबजावणी झाली की नाही हा प्रश्न सरकारला विचारला पाहिजे. सरकारने त्यावर आत्मचिंतन करावं, असं संभाजीराजे म्हणाले.

मला माहित आहे देवाचे मंत्र सकाळीच बोलतात, मात्र आता संभाजीराजांचा मंत्र डोक्यात यायला लागलाय. याची कारणे त्यांच्या हृदयात आहे. हे त्यांनाच विचारा मी काय ज्योतिषी नाही. शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी ज्योतिषाला मानलाच नाही. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, असा टोला त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

मी लोकांना वेठीस धरू शकत नाही. मी 2007 पासून मराठा समाजाचा लढा देत आहे. हे केव्हा आले हेच मला माहित नाही. हे त्यांनाच विचारा. मला कोणी कोणी शिकवण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी यावेळी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट

प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनाने निधन

महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात; नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबईत दररोज हजारांच्या आत नव्या कोरोनाबाधितांची होतेय नोंद, कोरोनामुक्तीचा दर 95 टक्क्यांवर

आनंदाची बातमी! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आजची दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More