नवी दिल्ली | सोने-चांदीच्या दरात रोज चढ उतार होत असताना भारतीय सराफ बाजारात सोने-चांदी स्वस्त झालं आहे. आज सोने आणि चांदी दोन्हीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.
24 कॅरेट सोने आता 138 रूपयांनी स्वस्त झाले आहे. 24 कॅरेट सोन्यासाठी 10 ग्रॅम मागे 49440 रूपये मोजावे लागणार आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 104 रूपयांची घसरण झाली आहे. त्यानुसार 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी 45287 रूपये मोजावे लागणार आहेत.
सोन्याच्या दराप्रमाणे चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. आज किलोमागे चांदीचे दर 63045 रूपये नोंदवले गेले आहेत.
दरम्यान, दिवसातून दोन वेळेस सोने आणि चांदीचे दर जारी केले जातात. सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत असताना येत्या काळात सोन्याचे भाव वधारण्याची शक्यता जाणकरांकडून व्यक्त केली जात आहे.
थोडक्यात बातम्या-
भरधाव बाईकची ट्रकला धडक; काळजाचा थरकाप उडवणारा अपघात
“भाजपला दूध दिसत नाही, शेण दिसतं, त्यांचा दृष्टीकोनच तसा आहे”
मेरा यही अंदाज ज़माने को खलता है, संजय राऊतांचं नवं ट्विट चर्चेत
ना परिक्षा ना मुलाखत, पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ‘इतका’ पगार
…अन् भाजप नगरसेवकाने लावले अजित दादांच्या आभाराचे बॅनर्स
Comments are closed.