बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वातंत्र्यदिनानिमित्त गुगलने बनवलंय हे एक खास डुडल

नवी दिल्ली | आज 74 वा स्वातंत्र्य दिवस असून देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. आज संपूर्ण देश तिरंगामय झाला आहे. त्यातच डिजिटल माध्यमही मागे नाहीत. गुगलने आजच्या खास दिवसानिमित्त एक डुडल बनवलं आहे.

हे डुडल नुसतं एखादे डिजाईन किंवा फोटो नाही तर भारतातील विविध कलाकृती आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारं आहे. हे डुडल भारतामध्ये असलेली संगीत विविधता दर्शवत आहे.

मुंबईचे कलाकार सचिन घाणेकर यांनी हे खास डुडल बनवलं आहे. तुतारी, सनई, ढोल, वीणा, सारंगी आणि बासुरी असे विविध संगीत वाद्य या डुडलमध्ये दाखवण्यात आले आहे. हे वाद्य दाखवून गुगलने तब्बल 6000 वर्षांपेक्षाही जुने संगीत वाद्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतातील जुने संगीत वाद्य नवीन पिढीला माहित होण्यासाठी आणि त्यांचे जतन करण्यासाठी गुगलने हा प्रयत्न केला आहे. त्या डुडलवर क्लिक वर केल्यावर आजच्या दिवसाची खास विविध माहिती मिळेल.

महत्वाच्या बातम्या-

जे दिसतात ते सोबत नसतात, जे सोबत असतात ते दिसत नाहीत- उद्धव ठाकरे

ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

कोझिकोड दुर्घटना; बचाव पथकातील तब्बल 20 अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

स्वातंत्र्यदिनाला गालबोट; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतलं अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More