बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रमजानसाठी सरकारकडून मार्गदर्शक सुचना जारी; वाचा काय आहेत निर्बंध

मुंबई | राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारपासून राज्यात संचारबंदी लागू केली आहे. कोरोना संकटामुळे सर्व सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे रमजानसाठी देखील सरकारकडून मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार साठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये,  अशा सुचना दिल्या गेल्या आहेत.

रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण (अलविदा जुम्मा) करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात. परंतु यावेळी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरीता एकत्र जमू नये, आपापल्या घरातच दुवा पठण करावे. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तीनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सींग नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,  अशा मार्गदर्शनक सुचना सरकारने दिल्या आहेत.

रमजान महीन्यात कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ व इतर अन्नपदार्थ विक्रेते गर्दी करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य ती उपाययोजना करावी, अशा सुचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन’; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला

हारी बाजी को जितना हमें आता है!; शेवटच्या 5 षटकांमध्ये चमत्कार झाला!

संचारबंदीकाळात सरकारकडून कोणाला किती पैसे मिळणार? वाचा सविस्तर

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

लॉकडाऊनचे नियम- एकाच ठिकाणी संपूर्ण यादी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More