बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे”

मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(West Benga CM Mamata Banerjee) यांनी महाराष्ट्र दौरा करत देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची भेटी गाठी घेतल्या. ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यानंतर राज्यात चांगलाच राजकीय सामना रंगला आहे. मुंबईत येऊन ममता बॅनर्जी उद्योग पतींना भेटल्या, मुंबईतील उद्योल बंगालात पळवायचा त्यांचा डाव आहे, अशी टीका भाजप(BJP) नेते आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी केली होती.

त्यावरून आता शिवसेना(Shiv Sena) नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी संजय  राऊत यांनी गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल,(Anandiben Patel)योगी आदित्यनाथ(UPCM Yogi Adityanath) तसेच गुजरातच्या मंत्रिमंडळाची केलेल्या मुंबई दौऱ्याची आठवण करून दिली. सामनातील अग्रलेखातून संजय राऊत यांनी भाजपला चिमटे काढले आहेत.

ममता बॅनर्जींनी जाताना सोबत काहीच नेलं नाही. उगाच ओरड करणाऱ्यांनी आणि मुंबईला ओरबाडणाऱ्यांना साथ देणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. भाजप (BjP) विरोधासाठी विरोध करतो हे ममतांच्या दौऱ्यातही दिसलं. मुंबईत येऊन उद्योगपतींना भेटण्यात गैर काय?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावर टीका करणारे भाजपा नेतृत्व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल(Gujarat CM Bhupendra Patel) त्यांचं अर्ध मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले. व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईतल्या उद्योगपतींना गुजरातचं निमंत्रण देण्यासाठी ते आले, खुंटा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री पटेल इथे अवतरले असचं भाजपचं मत असायला हवं, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक बातमी! Omicron बाबत आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

“…तर राज्यात लाॅकडाऊन लावावं लागेल”

महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; राज्यात आढळला Omicronचा पहिला रूग्ण

“…मग हा हट्ट कशासाठी?”, नाराजी व्यक्त करत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

तेजस्विनी पंडीत म्हणते ‘लिपस्टिक बॅन’, चाहत्यांना पडला प्रश्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More