मुंबई | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातल्या विविध भागांत जोरदार पाऊस बरसतो आहे. उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळतो आहे. तर काही ठिकाणी मात्र पावसाने रौद्ररूप धारण केलेलं दिसून येत आहेत. पावसाच्या कहराने काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत.
▪️#रत्नागिरी तील मांडवी किनाऱ्यावर वाऱ्याचे तांडव
▪️रत्नागिरी शहर आणि परिसरात तसेच ग्रामीण भागात वादळी #पाऊस
▪️तापमानात घसरण
▪️विजेच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट
________________________________https://t.co/jTVPMu7fNM pic.twitter.com/kgxVKWroHf— Anagha Nikam- Magdum (@meanagha) May 14, 2020
दुपाररनंतर राज्यातल्या अनेक ठिकाणी ढग दाटून आले होते. तसंच मोठ्या प्रमाणावर वादळ सुटलं होतं. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. सुमारे दोन ते तीन तास मुसळधार पाऊस बरसत होता. शहरी भागात तसंच ग्रामीण भागांत देखील पावसाने हजेरी लावली.
पुण्यात तुफान पाऊस चालू आहे.#म #मराठी #मराठीकट्टा #पाऊस #pune pic.twitter.com/t0uoeRJyfa
— Sandip Hole (@SandipHole9) May 14, 2020
मार्च एप्रिल आणि मे महिन्यांच्या उन्हाने आणि उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. कालच्या पावसाने नागरिकांना जरासा दिलासा मिळाला. काही वेळ तरी उकाड्यापासून त्यांनी मोकळा श्वास घेतला. तर काही ठिकाणी मात्र आवकाळी पावसाने शेतीचं नुकसान झालं.
नारायणगांव ता. जुन्नर जि.पुणे येथे जोरदार अवकाळी पाऊस शेतीचे मोठे नुकसान #Heavy_unseasonal_rain #pune #narayangaon #rain @CMOMaharashtra @OfficeofUT @PawarSpeaks @AGROWON pic.twitter.com/qrQ3VUtV0X
— Ganesh Balasaheb Kore (@GBKore) May 14, 2020
काही ठिकाणी या मोसमातला पहिल्यांदाच पाऊस पडला. नागरिकांनी या पावसाचा आनंद देखील घेतला.
पहिला पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा…
😍🌧😍🌧#ThursdayThoughts #पहिलापाऊस🌧 pic.twitter.com/iSgiHTW3Av— Rohit Jadhav (@_jadhavrohit) May 14, 2020
पाणी च आहे हो शेवटी!
ढगातून आलं की पाऊस आणि
शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आलं की आनंद😄 किंवा दुख:😔 ,
पण हे त्या पावसाच्या आगमनावर आणि ठिकाना 📍वर आहे
की तो अवकाळी आहे की नित्य-नियमाचा,
कोकणातला 💚की विदर्भातला💔 ! #rainytales #raining pic.twitter.com/Ks6N0PMVkB— 🇮🇳 ओंकार दिलीप मोरे 🇮🇳 (@omkar_10_24) May 14, 2020
ट्रेंडिंग बातम्या
‘मला पण योगदान देऊ द्या’; पंतप्रधान मोदींच्या पॅकेजवर मल्ल्याचं ट्वीट
बिनविरोध आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शशिकांत शिंदे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
महत्वाच्या बातम्या-
पंतप्रधान किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले नसतील तर अशी करा तक्रार…
सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने रचला नवा इतिहास, 47 कोटीच्या वर हिट्स
…तर माझा भरोसा धरू नका; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा
Comments are closed.