बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई | शिंदे गट आणि शिवसेनेमधील संघर्ष दिवसेंदिवस टोक गाठत असल्याचं पाहायला मिळतंय. अशात आता शिवसेना खासदार हेमंत गोडसेंनी नवा गौप्यस्फोट केला आहे.

नवी दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर पहिल्यांदा गोडसे नाशिकमध्ये आले. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

संजय राऊत यांना कमी बोलायला लावा. कारण त्यामुळे जनता आणि आपलेच लोक नाराज होतात, असं उद्धव ठाकरेंना खासदारांनी सांगितलं होतं. काहींना परत येण्याची इच्छा होती. पण राऊतांच्या बोलण्यामुळे ते थांबले, ही वस्तुस्थिती आहे, असा गौप्यस्फोट हेमंत गोडसेंनी केली आहे.

दरम्यान, मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय सुरुवात केली. त्यावेळी बांधकाम व्यवसाय बाजूला ठेवून लोकांना न्याय देण्यासाठी काम केलं. 2014 मध्ये खासदारकीची संधी दिली. त्यावेळी 1 लाख 87 हजारांच्या मताधिक्याने निवडून आलो. आत्ता जो संघर्ष आहे, तो सत्तेसाठी नसून विकासासाठी असल्याचं गोडसेंनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेना आमदार, खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावं”

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ला जाहीर

मोठी बातमी! बंडखोर आमदाराचा उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

’13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर…’; मोदींचं जनतेला आवाहन

“गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात, तुमची तेवढी लायकी नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More