Top News

धक्कादायक! महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी झाडल्या गोळ्या

अलीगढ | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 71 व्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या पुतळ्यावर उत्तर प्रदेशातील हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यानंतर महात्मा नथुराम गोडसे अमर रहे, अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा शकुन पांडे यांनी नकली बंदुकीच्या सहाय्यानं महात्मा गांधीच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. 

महात्मा गांधी यांच्या पोस्टरला गोळ्या झाडल्या नंतर उपस्थित कार्यकर्त्यांना मिठाई देखील वाटण्यात आली.

दरम्यान, हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसेच्या फोटोला हार घालून अभिवादन देखील केलं.

महत्वाच्या बातम्या-

‘हिटमॅन’ रोहित करणार उद्याच्या सामन्यात अनोखं ‘द्विशतक’

-पटक देंगे म्हणणाऱ्या अमित शहांचा सूर बदलला; उद्धव ठाकरेंना केला फोन

-काँग्रेसला राम जन्मभूमीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही- अमित शहा

काँग्रेसकडून पुण्यासाठी मोहन जोशी आणि अभय छाजेड यांच्या नावाची शिफारस

-महाआघाडीची सत्ता आल्यास दररोज पंतप्रधान बदलला जाईल- अमित शहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या