Top News क्राईम पुणे महाराष्ट्र

पूजा चव्हाण प्रकरणात ऑडिओ क्लीप कशा लीक झाल्या?; समोर आली धक्कादायक माहिती

पुणे | पूजा चव्हाण प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात तब्बल 12 ऑडिओ क्लीप समोर आल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत समोर आलेल्या ऑडिओ क्लीप हे महत्त्वपूर्ण पुरावे मानले जात आहेत.

या ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यातून या क्लीप नेमक्या कशा बाहेर आल्या याबाबत विचारणा केली जात आहे. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पूजाने आत्महत्या केलेल्या दिवशीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोड या कार्यकर्त्याकडून ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचं समोर येत आहे. त्याचवेळी अरूणच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान ज्या कार्यकर्त्याने या क्लीप अरूण राठोडकडून घेतल्या तो देखील आता माध्यमांसमोर येण्याचं टाळत असल्याचं कळतंय.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान पूजा चव्हाणच्या घरात चार दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पूजा चव्हाण हिने मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी केल्यानंतर पाय घसरून किंवा चक्कर येऊन ती खाली पडल्याचं काहींचं म्हणणं आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

थोडक्यात बातम्या

भेटी लागे जिवा… विठुराया आणि भक्ताच्या ‘या’ भेटीनं साऱ्यांचे डोळे पाणावले!

गुंड गजानन मारणेची तुरुंगातून सुटका, 500 गाड्या स्वागताला; पाहा 5 व्हायरल व्हिडीओ-

आयपीएलच्या लिलावाआधी मोठी घोषणा, ‘या’ सघानं घेतला नाव बदलण्याचा निर्णय!

रस्ते वाहतूक मंत्रालयाची मोठी घोषणा, ‘त्या’ वाहनचालकांना आता थेट मिळणार वाहन परवाना!

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जिवेत् शरद: शतम् योजना’; नेमकी काय आहे ही योजना???pooja chvahsanjay

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या