बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आबांच्या पाऊलावर पाय टाकत आहे, त्यामुळे काहींनी… – रोहित पाटील

सांगली | राज्यात नगर पंचायत निवडणूक (Nagar Panchayat Election) प्रक्रिया सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय खलबतं सुरु होऊन आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहे. त्यामुळे सगळे नेते प्रचारात व्यस्थ असलेले दिसत आहेत. अशातच आता सांगली जिल्ह्यात रोहित पाटील (Rohit Patil) कवठेमहांकाळ निवडणुकीचा प्रचार करत आहे.

निवडणूकींच्या प्रचार सभेत सांगलीतल्या कवठेमहांकाळ नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या पॅनेलला यश मिळेल, असा विश्वास रोहित पाटलांनी व्यक्त केलाय. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

वडिल आर.आर.पाटील यांच्या पाऊलावर पाऊल टाकत आहे. त्यामुळे काहींनी माझा बाप काढला, मात्र लोक कायम आमच्यासोबत उभे राहिले. घरात बसून आबांचा वारसा सांगितलं असतं तर लोकांनी स्वीकारलं नसतं असंही रोहित पाटलांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, आज मी जे पॅनल निवडलंय, त्यावर सर्वसामान्य लोक म्हणतातय की, तुम्ही आमच्या मनातील पॅनल निवडलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वसामान्य माणसानं खांद्यावर घेतलं आहे, असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

MHADA पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; ‘या’ भाजप नेत्याला अटक

मुंबई पोलिसांच्या तपासाला ब्रेक; शाहरूख खानच्या ‘या’ पावलामुळे समीर वानखेडेंना दिलासा

TET घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट, आणखी एका बड्या अधिकाऱ्याला अटक

सोनं-चांदी दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More