बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बास झालं राजकारण, हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं…’; उदयनराजेंचं खुलं आव्हान

मुंबई | महाविकास आघाडीतील नेत्यांवर सध्या ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर राजकीय हेतूने करत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष भाजपवर करत आहे. यावरून राज्यात विरोधक आणि सत्ताधारी पक्ष आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे यांनी महाविकास आघाडी सरकारला ईडीच्या चौकशीबाबत इशारा दिला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे. जसं आपण पेरतो, तसं उगवत आहे. त्यामुळे आमच्या मागे ईडी लागलेली नाही. ज्यांनी वाईट केलं आहे, त्यांच्या मागे ती लागलेली आहे. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं. पुरव्यासह मी ईडीला यादी देतो. कोणीही असू द्या,  मी सर्वांची यादी देईन. एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे बाहेर काढायचं. पुरे झालं आता राजकारण, असंही उदयनराजे यांनी म्हणाले.

गेल्या काही दिवसापांसून राज्यातील राजकारण ईडी, सीबीआय आणि एनसीबी या केंद्रीय यंत्रणाचा भोवती फिरताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब, छगन भुजबळ यासारख्या मोठ्या नेत्यांना ईडीने समन्स बजावलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष भाजपवर करत आहे. विरोधकांचे हे आरोप भाजपने फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी देत हर्षवधन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही, आता मस्त वाटतंय, अस वक्तव्य हर्षवधन पाटील यांनी केलं होतं.  त्यांच्या या वक्तव्यांवरून राज्यात अनेक राजकीय तर्क वितर्क लावले जात आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आमदारांची दिवाळी गोड! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दिवाळीनिमित्त BSNLची खास ऑफर! ‘या’ महिन्यात मिळेल फुकट डेटा-काॅलिंग

मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी अटक नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

“दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा तसेच कोणत्याही वर्गाचा नाही”

नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर NCB ‘या’ कारणामुळे न्यायालयात जाणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More