बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बायकोचा वाढदिवस विसरणं पडू शकतं महागात; ‘या’ देशाने केलेला कायदा वाचून थक्क व्हाल

एपिया | एकमेकांत समन्वय राहावा, कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी समाजात अनेक नियम व कायदे घालून देण्यात आले आहेत. अनेक देशात वेगवेगळे कायदे असतात. त्या त्या देशाची विचारसरणी, आर्थिक परिस्थिती हे सर्व पाहून कायद्यांची चौकट निश्चित केली जाते.

कठोर कायद्यांसह अनेक देशात काही हटके कायदेही लागू केले जातात. आता नवरा जर बायकोचा वाढदिवस विसरला तर त्याची रवानगी थेट कारागृहात होणार आहे. पॅसिफिक महासागरात सामोआ नावाचा एक छोटा देश आहे. या देशाने बायकोचा वाढदिवस विसरणाऱ्या नवऱ्यांविरोधात कठोर पाऊल उचललं आहे.

या देशातील कायद्यानुसार बायकोचा वाढदिवस विसरणं हा एक गुन्हा आहे. नवरा जर बायकोचा वाढदिवस विसरलाच तर त्याला शिक्षा देण्याची तरतूदही या देशाच्या कायद्यात करण्यात आली आहे. नवरा त्याच्या बायकोचा वाढदिवस विसरला तर त्याला तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.

बायकोने तिच्या नवऱ्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली तरच नवऱ्यावर कारवाई होऊ शकते. यासाठी अजून एक अट म्हणजे नवरा आपला वाढदिवस विसरला असा स्पष्ट उल्लेख तक्रारीत असला तरच त्या नवऱ्याला तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.

थोडक्यात बातम्या-

मी देशातील सर्वात शक्तिशाली महिला आहे- कंगना रनौत

‘…त्यावेळी मात्र या सरकारला लकवा मारतो’; भाजप नेत्याची बोचरी टीका

ओमिक्रॉनचा प्रसार आणखी वाढणार?; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

ATMमधून पैसे काढताय! मग जाणून घ्या ‘ही’ नवीन नियमावली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More