Top News महाराष्ट्र मुंबई

तुम्हालाही ‘हा’ मेसेज आला असेल तर सावधान; तुमचे पैसे चोरीला जाऊ शकतात!

मुंबई  | सध्या जगात सगळीकडे ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार केले जात आहे. यामुळं वेळेची बचतही होतं असल्यामुळं सर्वसामान्य लोकंही नेटबॅंकिंगकडे वळू लागली आहेत. याचसंदर्भात एक महत्वपूर्ण माहिती सायबर क्राईमच्या मुख्य कार्यालयानं ट्विटरवरुन दिली आहे.

सायबर गुन्हेगार लोकांना तुमच बॅंक खात नॉमिनीसोबत जोडलं गेल आहे. तुम्ही पुढच्या 30 मिनिटात नॉमिनीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकता. जर तुम्ही तसं केलं नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तक्रार दाखल करु शकता,असा मेसेज पाठवला जात आहे.

अनेक युजर्स कोणताही विचार न करता लिंकवर क्लिक करतात. त्यामुळं युजर्सच्या खात्यातून पैसे देखील चोरीला जाऊ शकतात. त्यामुळं सायबर क्राईमकडून वाचण्यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे.

जर तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही मेसेज किंवा मेसेजव्दारे लिंक आली तर तातडीने सायबर पोलिसांना याबाबत माहिती द्या, असं आवाहन सायबर क्राईमच्या गृहमंत्रालयानं जनतेला केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रसिद्ध अभिनेत्यावर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचे आरोप

“पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

लसीवर कोविड योद्ध्यांचा पहिला हक्क- पंतप्रधान नरेंद्र मोदी

“भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरवल्याशिवाय राहणार नाही”

लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेनी केली मुख्यमंत्र्यांकडं ‘ही’ मागणी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या