शेवटच्या चेंडूवर भारताचा अत्यंत थरारक विजय

चेन्नई | शेवटच्या चेंडूपर्यंत अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. शेवटून दुसऱ्या चेंडूवर धवन बाद झाल्याने शेवटच्या चेंडूवर विजयी धाव काढण्याचं आव्हान मनिष पांडेपुढं होतं, त्यानं ते लिलया पेललं.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची पिसं काढली होती. भारतापुढे धावांचा डोंगर उभा करण्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना यश आलं होतं. 

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी मात्र निराशा केली. रोहित शर्मा लवकर बाद झाला मात्र शिखर धवनने एकहाती किल्ला लढवला. त्याने 62 चेंडूत 92 धावा केल्या. 

पहिले दोन सामने जिंकून भारताने ही मालिका याआधीच खिशात घातली होती. शेवटचा सामना जिंकून भारताने शेवटही गोड केला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-नेता असावा तर असा! 21 कार्यकर्त्यांना फुकट वाटल्या दुचाकी

-शहा हा पर्शियन शब्द; भाजपाध्यक्ष अमित शहांचं नाव बदलण्याची मागणी

-दिवाळीत बंद झालेलं भारनियमन पुन्हा सुरु होणार नाही; उर्जामंत्र्यांची घोषणा

-औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्यासाठी पाठपुरावा करु!

-भाजपऐवजी जेडीयूमध्ये का प्रवेश केला?; पाहा काय म्हणाले प्रशांत किशोर…