खेळ

भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, व्याजासकट केली परतफेड

ऑकलंड | भारत विरूद्ध न्यूझीलंडच्या दुसरा टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीमूळे भारताने हा सामना जिंकला आहे.

शिखर धवन आणि रोहित शर्माच्या खेळीमूळे भारताने हा विजय मिळवला आहे. रोहित शर्माने अवघ्या 29 बॉलमध्ये 50 धावांची स्फोटक अर्धशतकी खेळी केली. यात 4 सिक्स तर 3 चौकारांचा समावेश होता.

रोहित शर्मा 50 धावा करुन बाद झाला. रोहित शर्माच्या पाठोपाठ शिखर धवनही 30 धावा करुन बाद झाला. 

दरम्यान, भारताकडून कृणाल पंड्याने 4 षटकात 28 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. महेंद्रसिंग धोनी आणि रिषभ पंत या सामन्यात नाबाद राहिले.

महत्वाच्या बातम्या-

-मी भारतरत्न सन्मानाच्या कितपत योग्य, मला माहित नाही- प्रणव मुखर्जी

“राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल”

-काँग्रेसचा ‘उमेदवारी पॅटर्न’ अशोक चव्हाणांनी सांगितला, म्हणाले…! 

आलाय तर संसदेत हजेरी लावून या; पवारांचा उदयनराजेंना सल्ला

पायाखालची जमीन सरकल्यानंच ‘त्यांनी’ हे मत मांडलं- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या