पुण्याच्या राहुल त्रिपाठीची विस्फोटक खेळी, कोलकात्याचा पराभव

Photo- BCCI

कोलकाता | सलामीवीर राहुल त्रिपाठीच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पुण्याने कोलकात्याला ४ गडी राखून पराभव केला. राहुल त्रिपाठीचं शतक मात्र थोडक्यात हुकलं.

कोलकात्यानं प्रथम फलंदाजी करताना पुण्याला विजयासाठी १५६ धावांचं आव्हान दिलं होतं.  सलामीवीर अजिंक्य रहाणे अवघ्या ११ धावांवर माघारी परतला, त्यानंतर राहुलने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत ५२ चेंडूत ९३ धावांची खेळी केली. दरम्यान, कोलकात्याकडून मनिष पांडेनं सर्वाधिक ३७ धावा केल्या. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या