बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारत बायटेकने जाहीर केली लसीची किंमत; सीरमची लस स्वस्त की भारत बायटेकची?, जाणून घ्या 

नवी दिल्ली | देशभर कोरोना लसीकरण चालू आहे. सध्या 45 वर्षावरील लोकांना कोरोना लस देत आहेत. लोकही वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लस घ्यायला जाताना दिसत आहेत. त्यानंतर 1 मेपासून देशातील 18 ते 45 वयोगटातील लोकांना लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार असला तरी यासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होणे हे एक मोठे आव्हान आहे.

सिरमने कोव्हिशील्ड लशी साठी केंद्राला 150 तर राज्यांना 400 रुपये दर जाहीर केला असून खासगी रुग्णालयात ही लस 600 रुपयात उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर कोरोना प्रतिबंधक लशींच्या किमतीवरून महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आताभारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या लसीच्या किमती जाहीर केल्या आहेत.

भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लशीची किंमत केंद्र सरकारसाठी 150 रुपये तर राज्य सरकारांसाठी 600 रुपये जाहीर केली असून खासगी रुग्णालयांसाठी 1200 रुपये दर जाहीर केला आहे.

दरम्यान, दोन्ही लस उत्पादक कंपन्यांनी आपल्या लसीची किंमत कमी करावी अशी सूचना केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सिरमला केली आहे. त्यामुळे आता लस कंपन्या लसींच्या किमती कमी करतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकूंचं कोरोनामुळे निधन

“मेच्या ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्राला लस पुरवता येणार नाही, मोदी सरकारनं स्टॉक बुक केला आहे”

मुंबईतील कोरोना बळींचा आकडा लपवला जातोय- देवेंद्र फडणवीस

“सगळी इंजेक्शन आधीच वाटली आहेत, आता रिकामी खोकी घेऊन जाऊ शकता”

पुण्यात कोरोनाबाधितांचा वाढता आलेख; वाचा आजची आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More