बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् ‘त्या’ घटनेनंतर खासदारानं वाटले चक्क ‘चाॅकलेट आणि आंब्याचे पापड’

नवी दिल्ली | देशाच्या लोकशाहीचं मंदिर म्हणून संसदेला (Parliament) ओळखण्यात येतं. देशाच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्वात महत्त्वाचे कायदे (Bills) या संसदेत पारित करण्यात येतात. जनतेनं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निवडून दिलेले प्रतिनिधी (Members) या सभागृहात आपलं नेतृत्व करत असतात. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) चालू आहे. सर्व देशाचं लक्ष या अधिवेशनाकडं लागलं आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या चालू असलेलं आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजत आहे. गत एक वर्षापासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन अजून संपलेलं नाही. या आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं मदत करावी अशी मागणी करताना राज्यसभेत मोठा गोंधळ झाला होता. या प्रकरणी राज्यसभा सभापतींनी सदनातील 12 खासदारांना निलंबित केलं आहे.

निलंबित खासदार संसदेच्या आवारात असणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी आंदोलन करत आहेत. या आंदोलक खासदारांना समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन (MP Jaya Bachchan) यांनी चाॅकलेट टाॅफी आणि आंब्याचे पापड दिले आहेत. अशा अनोख्या पद्धतीनं श्रीमती बच्चन यांनी खासदारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जया बच्चन यांच्या या अनोख्या अंदाजाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

दरम्यान, सरकारनं आमच्याकडं आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची कसलीही माहिती उपलब्ध नसल्याचं संसदेत म्हटलं आहे. परिणामी आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

“वीज फुकटात तयार होत नाही, शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेल”

“Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रसुद्धा…”, ममता बॅनर्जींना खात्री

“अयोद्धा-काशी जारी है, मथुरा की अब तैयारी है”

“भंगार Nawab Malik स्वतःला डिटेक्टीव्ह करमचंद समजायला लागलाय”

Omicron: ओमिक्रॉनवर लस कधी बनणार?, आली ‘ही’ माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More