बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एवढी काळजी त्यांनी आधीच केली असती तर…- ज्योतिरादित्य शिंदे

नवी दिल्ली | ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असते तर आता मुख्यमंत्री दिसले असते. पण सध्या ते भाजपमध्ये बॅक बेंचर बनले असल्याचा टोला काँँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदेंना लगावला होता. यावर ज्योतिरादित्य शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांना आता जेवढी काळजी आहे, तेवढी त्यांनी त्यावेळी करायला हवी होती जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो. या पेक्षा अधिक मला काही बोलण्याची गरज वाटत नाही, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल गांधी यांनी सोमवारी इंडियन यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या संघटन कौशल्याचं कौतुकही केलं. पण शिंदे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल खंतही व्यक्त केली. तसेच मी त्यांना सांगितलं होतं की एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री व्हाल. पण त्यांनी आपला मार्ग निवडला. त्याचबरोबर शिंदे आतापर्यंत मुख्यमंत्री झाले असते, जर ते काँग्रेसमध्ये असते. पण आता ते भाजपत पिछाडीवर गेले असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.

तिरादित्य शिंदे यांनी गेल्या वर्षी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गोटातील 20 पेक्षा अधिक आमदारही काँग्रेसमधून बाहेर पडले. यानंतर मध्य प्रदेशनधील कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आणि कोसळलं.

थोडक्यात बातम्या-

…तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाहीत- निलेश राणे

उधारीचे पैसे मागणं पडलं महागात; विधवा महिलेसोबत घडली अत्यंत धक्कादायक घटना

गेल्या 10 दिवसांपासून जळतंय ओडिसाचं जंगल; हजारो प्राण्यांच्या जिवाला धोका

…अन् भर पत्रकार परिषदेत खासदारानं महिला आमदाराच्या गालाला लावला हात, पाहा व्हिडिओ

.पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचा पेच अखेर सुटला; ‘या’ तारखेपासुन परीक्षेला सुरूवात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More