बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाविषयी संजय राऊत यांचं खळबळजनक वक्तव्य

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी पुन्हा एकदा ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या पंडितांच्या मुद्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. 370 कलम वाढवल्यावरही पंडितांची घरवापसी होऊ शकली नाही. हे कोणाचे अपयश आहे?, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे. तसेच कश्मीरी पंडितांवरील अन्यायावरून आक्रोश करणाऱ्यांना राऊत यांनी थेट सवाल केले आहेत.

‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून हा सवाल केला आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ सारखे चित्रपट निर्माण व्हायला हवेत पण अशा चित्रपटांचा सध्याचा अजेंडा हा राजकीय विरोधकाबाबत द्वेष आणि भ्रम फैलावणे असाच झाला आहे. देशाचा इतिहास फक्त पुस्तकातून बदलला जात नाही तर, आता चित्रपटांसारख्या माध्यमांतूनही तो बदलण्याचा प्रयत्न होतोय, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

1990 साली 4 लााख हिंदू शिखांना कश्मीर सोडण्यास भाग पाडले. तेव्हा केंद्रात भाजपच्या पाठिंब्यावर व्ही. पी सिंगांचे सरकार होते. भाजपचे नेते जगमोहन हे काश्मीरचे राज्यपाल होते. खोऱ्यात हिंदू मरत होते, पळत होते तेव्हा ‘काश्मीर फाईल्स’ थंड बसनात पडून होती, असा दावाही राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, ‘द काश्मीर फाईल्स’ हा पुढच्या निवडणुकीचा अजेंडा आहे. कश्मीरमधील सत्य दडपवण्याचा प्रयत्न झाला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय बैठकीत सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

Gold Rate: सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा काय आहेत दर

कोरोनाची चौथी लाट येणार?; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

पुतिन यांनी 1 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, धक्कादायक कारण समोर

“आमचे आमदार फुटणार नाहीत, कुणी फुटलाच तर…””

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More