केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या

तिरुवनंतपुरम | केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणखी एका कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आलीय. अानंदन असं या 23 वर्षीय कार्यकर्त्याचं नाव आहे. 

आनंदन आपल्या दुचाकीवरुन जात असताना कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात जखमी झालेल्या आनंदनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. 

दरम्यान, हल्लेखोर माकपचे कार्यकर्ते असल्याचं कळतंय. 2013 साली झालेल्या माकपच्या कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणात आनंदन आरोपी होता. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.