संजय राऊतांच्या आरोपावर किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई | शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जहरी शब्दांमध्ये टीका केली. पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये किरीट सोमय्या यांचा संबंध आहे. सोमय्यांचा मुलगा मास्टरमाईंडच्या कंपनीत डायरेक्टर आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
यावर किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. मी कुठल्याही बेकायदेशीर व्यवहारामध्ये सहभागी नाही. पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कोविड घोटाळ्यावर का बोलत नाहीत?, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. यावेळी किरीट सोमय्या यांनी माझ्या पत्नीलाही बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, असंही म्हटलं आहे.
2017 साली सामनातून बिल्डिंग कन्ट्रक्शन कंपनीमध्ये माझी पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्याविरूद्ध 10 खटले दाखल केले आहेत. आणखी एका प्रकरणाचं मी स्वागत करतो, असं त्यांनी म्हटलं आहे. कोविड उपचार केंद्रातील गैरव्यवहार आणि मी केलेले आरोप प्रवीण राऊत, सुजित पाटकर यांच्या संबंधाबाबत एक शब्दही उच्चारला गेला नाही, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, माझं आदित्य ठाकरेंना आवाहन आहे की, किरीट सोमय्यांच्या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा. ईडी वाले सुनो, सीबीआयवाले सुनो हा जो किरीट सोमय्या आहे ना एक फ्रॉड आहे. त्यांनी बँक घोटाळा केला आहे. लोकांचे पैसे बुडवले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”
“पुन्हा येताना ते व्हिडीओ घेऊन येणार???”, पत्रकार परिषद संपताना राऊतांचा गौप्यस्फोट
“मुलुंडचा दलाल”; संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांचा असा उल्लेख
“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”
“मला ती लोकं म्हणाली, केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील”
Comments are closed.