बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ललित मोदी अन् अभिनेत्री सुष्मिता सेनचं झालं लग्न?, खासगी फोटो व्हायरल

मुंबई | अभिनेत्री सुष्मिता सेन ही लग्न बंधनात अडकली असल्याची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध बिझनेसमन ललित मोदी (Lalit Modi) यांच्यासोबत सुष्मिताने मालदीवमध्ये लग्नगाठ बांधल्याची माहिती सोशल मिडियावर प्रंचड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या सुष्मिता सेन आणि ललित मोदी हे दोघं सध्या मालदिवमध्ये आपल्या कुंटुबासोबत सुट्टीला गेले आहेत. यातच ललित मोदी यांनी ट्विटरवर सुष्मिता सेन सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. माझ्या betterhalf सुष्मितासोबत आहे, असं ललित मोदीने पोस्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे ते दोघं लग्नबंधनात अडकले असल्याची बातमी सगळीकडे पसरली होती.

ललित मोदीने यानंतर ही बातमी खोटी असल्याचं सांगत अजुन एक ट्विट करत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. फक्त स्पष्टतेसाठी सांगत आहोत. आम्ही सध्या विवाहित नाही. फक्त एकमेकांना डेट करत आहोत. तेही एक दिवस होणारच, असं ललित मोदीने म्हटलंय.

अभिनेत्री सुष्मिता सेन एक भारतीय मॉडेल आणि मिस युनिव्हर्स 1994 स्पर्धेची विजेती आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्यानंतर तिने चित्रपटात काम केलं आहे. 46 वर्षीय अभिनेत्री शेवटची वेब सीरिज आर्या 2 मध्ये दिसली होती.

 

थोडक्यात बातम्या

“महाराष्ट्राला 18 तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले”

मोठी बातमी! 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना झटका; ‘या’ वस्तू महागणार

असंसदीय शब्दांची यादी जाहीर; संसदेत जुमलाजीवी, हुकूमशाही शब्द वापरण्यास बंदी

मोठी बातमी! शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय; वाचा एका क्लिकवर 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More