बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विवाहित महिला आणि अविवाहित पुरूषांमधील लिव्ह इन संबंध अवैध- उच्च न्यायालय

जयपूर | राजस्थानच्या झुंझून जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेने राजस्थान उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. ही महिला काही महिन्यांपासून आपल्या नवऱ्याला सोडून राहत होती. त्यानंतर तिने एका 27 वर्षाच्या पुरूषासोबत राहणं चालू केलं. त्यादरम्यान तिला धमकीचे फोन येऊ लागले. त्यानंतर तिने थेट न्यायालयाचे दरवाजे वाजवले.

महिलेला धमक्या येऊ लागल्यानं तिला पोलीस संरक्षण देण्याची याचिका तिने दाखल केली. त्यावर एक सदस्य खंडपीठासमोर सुनावणी झाली. महिला पतीच्या शारिरिक छळ आणि मारहाणीला कंटाळून घर सोडून आली आहे. त्यानंतर ही महिला स्वतःच्या मर्जीने 27 वर्षीय पुरूषासोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. याला दोघांची संमती देखील आहे. पण महिलेला धमकी येत असल्यानं महिलेला संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी महिलेच्या वकिलांनी न्यायालयात केली.

महिला आणि लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या पुरूषाचे संबंध बेकायदेशीर आहेत. हे संविधानाच्या विरूद्ध आणि समाज मान्य नाही. त्यामुळे न्यायालयाने त्या दोघांना संरक्षण देऊ नये, असं पतीच्या वकिलांनी न्यायालयात म्हटलं आहे. जर न्यायालयाने महिलेला संरक्षण दिलं तर न्यायालयाला हे बेकायदेशीर लिव्ह इन मान्यता आहे असं स्पष्ट होईल, असंही विरोधी वकिलांनी म्हटलं.

दरम्यान, महिलेचा घटस्फोट झाला नाही. त्यामुळे विवाहित महिला आणि अविवाहित पुरूषांमधील लिव्ह-इन संबंध बेकायदेशीर असल्याचं न्यायालयानं निकाल देताना सांगितलं आहे. त्याचसोबत महिलेला संरक्षण देण्याची याचिका देखील रद्द करण्यात आली आहे. महिला पोलिस ठाण्यात जाऊन संरक्षण मिळवू शकते, असंही यावेळी न्यायालयाने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“राष्ट्रपती पळाले तसं मी पळणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार”

‘महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे, तुम्हाला….’; अफगाणी विद्यार्थ्यांना आदित्य ठाकरेंनी दिला धीर

गोळीबार सुरू असतानाही महाराष्ट्राची लेक नमली नाही; भारतीयांना मायदेशी सुखरूप आणलं

एअरलिफ्ट यशस्वी! अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची सुटका

धर्म जगणे आणि धर्म जपणे यातील अंतर जाणा- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More