बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जनता भाजपला माफ करणार नाही- कमलनाथ

भोपाळ | मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारची बहुमत चाचणी विधानसभेत होणार आहे. मात्र कमलनाथ यांनी त्याआधीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनता भाजपला माफ करणार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

बंगळुरुमध्ये ज्या ठिकाणी आमदारांना ओलीस ठेवले जात आहे, त्या घटनेमागील सत्य या देशातील लोक पाहू शकतात. सत्य बाहेर येईल. जनता त्यांना माफ करणार नाही, असं कमलनाथ म्हणाले आहेत.

माझ्या प्रदेशाला हरवून जिंकू, असं भाजपला वाटत असेल, पण ते कधीच करू शकणार नाहीत, असा घणाघातही त्यांनी केला.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ सरकारकडे बहुमत नसल्याने सरकार टिकणं अवघड असल्याचं कबूल केलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी शेन वॉर्नचा मोठा निर्णय!

पंतप्रधानांकडे आवश्यक त्या मदतीची मागणी करणार- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

कमलनाथ सरकारची आज कसोटी; 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळलं; बहुमत चाचणीपूर्वी कमलनाथ यांचा राजीनाम्याचा निर्णय

“आपणच आमचे खरे हिरो आहात, एकत्रितपणे ही लढाई नक्की जिंकू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More