देश

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार

Loading...

नवी दिल्ली | विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यास आयोगाला मुहूर्त मिळाला आहे. येत्या सोमवारी म्हणजे 16 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

निवडणूक आयोगाची आज बैठक होत आहे. या बैठकीत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा ठरवल्या जातील. या तारखांची घोषणा सोमवारी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Loading...

महाराष्ट्रासह एकूण तीन राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक तारखा सोमवारी जाहीर होतील. तर झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील.

दरम्यान, याआधी येत्या 9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे यंदा 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं होतं.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या