बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

TMC आता नवीन डाव खेळण्याची शक्यता; पक्षात प्रवेश करताच बाबूल सुप्रियोंना मोठं गिफ्ट?

कोलकाता | राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या दोन महत्वाच्या घडामोडी शनिवारी घडल्या आहेत. अमरिंदर सिंग यांचा राजीनामा आणि बाबूल सुप्रियो यांचा टीएमसी प्रवेश या दोन प्रमुख घटना काल आपण पाहिल्या आहेत.

नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेले बाबूल सुप्रियो हे काल अचानक ममता बॅनर्जी यांच्या पक्षात गेले. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला पश्चिम बंगालमध्ये राजकीय धक्के बसत आहेत. आसनसोल लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले सुप्रियो हे भाजपच्या ममता विरोधाचा प्रमुख चेहरा होते. पेश्याने गायक असलेले सुप्रियो हे केंद्रात मंत्री पदावर होते. पण विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.

भाजप पक्षाला रामराम केल्याने त्यांची खासदारकी संपणार आहे. परिणामी त्यांना ममता बॅनर्जी या राज्यसभेवर पाठवण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या टीएमसी खासदार अर्पिता घोष यांनी काही दिवसापुर्वीच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. या जागेवर टीएमसीकडून सुप्रियो यांची वर्णी लागण्याची चिन्ह आहेत.

भाजप आणि टीएमसी यांच्यातील राजकीय वैर खूप मोठं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मोठी ताकद लावून सुद्धा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करता आला नव्हता. ममता यांनी थेट आता भाजपला सुरूंग लावायला सुरूवात केल्यानं पश्चिम बंगालचं राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत.

थोडक्यात बातम्या 

“जबाबदार नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि शिष्टाचार महत्वाचा”

दिव्या अग्रवाल ठरली बिग बॉस ओटीटीची विजेती; ट्रॉफीसह ‘इतके’ रुपये जिंकले

“मी वेळ देत नाही, ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल”

‘नवज्योतसिंग सिद्धूंचे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत …’; अमरिंदर सिंग यांनी केले गंभीर आरोप

‘राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक नसतील तर…’; शशी थरूर यांचं मोठं वक्तव्य!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More