राज्यात भाजपला धक्का; आमदाराची आमदारकीच रद्द!

मुंबई | विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात भाजपला एकावर एक धक्के मिळत आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांची आमदारकी रद्द झाली आहे.

निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात काशीवार यांनी कंत्राटदार असल्याची माहिती लपवली होती. त्यावर काँग्रसचे उमेदवार सेवक वाघाये यांनी काशीवार यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्या याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने काशीवार यांची आमदारकी रद्द केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ माजली आहे. 

दरम्यान, नागपूर खंडपिठाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती बाळा काशीवार यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सावधान!!! महाराष्ट्राला या आजाराचा विळखा वाढतोय…

-ऐन दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा सर्वसामान्यांना झटका

-पंकजा मुंडेंचा स्तुत्य उपक्रम; बचत गटांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी परदेश दौरा!

-हा व्हीडिओ पाहाल तर रोहित शर्माबद्दलचा तुमचा आदर आणखी वाढेल!

-… मंत्री झालो आणि सहकाराचा ‘जाच’ सुरू झाला- सुभाष देशमुख