बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या”

मुंबई | खासदार मोहन डेलकर यांच्यानंतर शिवसेनेकडून दादरा नगर- हवेली लोकसभा पोटनिवडणुकीकरिता मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरा नगर- हवेली लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्रे फडणवीस यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्युचं राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.  शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. पंतप्रधान मोदींच्या नावावर 56 जागा मिळाल्या. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर आहे. ते वसूली करतात. ते तुम्हाला इथे हवे आहेत का?असा सवाल देवेद्र फडणवीस यांनी सभेला उद्देशून बोलताना केला आहे.

मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर आहे. ते इथे आले तर नाव महाराष्ट्राचं घेतील आणि काम मुघलांच करतील,असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच देशातील गरिब जनतेसाठी पंतप्रधान मोदींनी योजना केल्या आहेत. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’हे मोदींनी देशात करून दाखवलं आहे. मोदींच्या सरकारमधून एक रूपया निघतो आणि तो गरिबांच्या खात्यात जातो, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून युवासेनेचे अध्यक्ष तथा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दादरा नगर- हवेली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील दादरा नगर- हवेली येथे प्रचारासाठी येणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“त्यांच्या सांगण्यावरून मलिक आरोप करतायेत, पुरावे असतील तर न्यायालयात जा”

“बिडीची जेवढी किंमत महाराष्ट्रात आहे तेवढी सुद्धा ईडीची राहिली नाही”

दिवाळीपूर्वी खवय्यांसाठी खूशखबर! ‘या’ गोष्टींच्या किंमतीत मोठी घट

निवडणुकीआधी भाजपची मोठी रणनिती! तब्बल 100 आमदारांचं तिकीट कापण्याची शक्यता

प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात निवडणूक लढणार का?; आली ‘ही’ माहिती समोर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More