निकालाआधीच काँग्रेसचं सेलिब्रेशन सुरु ; लावले विजयाचे बॅनर

भोपाळ | मध्यप्रदेशमध्ये निकालाच्या एक दिवस अगोदरच काँग्रेसनं विजयाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस कार्यालयाबाहेर कमलनाथ यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत.

राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये निकालाआधीच मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत.  

15 वर्षानंतर राज्यात काँग्रेसला सत्ता मिळण्याची आशा असल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात उत्साहाचं वातातवरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री पदाबाबत पत्रकारांनी विचारले असता कमलनाथ यांनी उद्यापर्यंत वाट पहा, उद्या सगळं चित्र स्पष्ट होईल, असं म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या –

-धुळे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता; विरोधकांचा सूपडा साफ

-मराठा आरक्षणविराेधी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला 

-भाजपला सर्वात मोठा धक्का; केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहंचा राजीनामा

-कोल्हापुरात भाजपला झटका, महापाैरपदी राष्ट्रवादीने मारली बाजी

-अहमदनगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर,वाचा ताजे कल