बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा मोदी-शहांचा डाव, राऊत मुंबईतच अडवणार”

मुंबई | अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. त्यामुळे गोवा किनारपट्टीपासून 150 किमी आतमध्ये चक्रीवादळला सुरूवात झाली आहे. याचा मोठा फटका भारताच्या पश्चिम किनारपट्टीला बसला असून आता हे वादळ मुंबईला भेदून गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. या चक्रीवादळावरून सोशल मीडियावर काही विनोद होत आहेत.

जळगावचे भाजप खासदार उमेश पाटील यांनी तौत्के चक्रीवादळावरुन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टोला हाणला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. मोदी आणि शहांचा चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा डाव आहे. पण संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार आहेत, असं उमेश पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

उमेश पाटील यांचं हे ट्विट सोशल माध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे. मागील काही तासांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी झाडं, विजेचे खांब कोसळले आहेत. तर काही ठिकाणी रस्तेही तुंबले आहेत.

दरम्यान, राजापूर, रत्नागिरीच्या किनारपट्टीभागात सोसाट्याचा वारा सुरू असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तौत्क चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई जवळून प्रवास करणार आहे. त्यामुळे किनारपट्टीभागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

शाब्बास पुणेकरांनो! आज बाधितांचा आकडा हजाराच्या आत तर…; वाचा आजची आकडेवारी

…अन् वरातीतील पाहुण्यानंच नवरीसोबत घेतले सात फेरे!

‘किसान सन्मान निधीचे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं ठरवलं की काय?’; पवारांचा मोदी सरकारला सवाल 

माणुसकी हरवली! रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ, पत्नीने दिला पतीला अग्नी 

“भारतात कोरोनाच्या आणखी बऱ्याच लाटा येणार, पुढील 6 ते 18 अत्यंत महत्त्वाचे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More