बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हायकोर्टाची महाराष्ट्र सरकारला मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अडीच कोटी जमा

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश, कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेच्या अधिनस्त काम करणारे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व आजी-माजी न्यायधीश, कर्मचारी तसेच न्यायिक अधिकारी आणि अधिनस्त कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या मदतीसाठी धन्यवाद दिले आहेत.

ठाणे जिल्हा सहकारी बँक लि. ने  ही  मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, कोरोनाविरोधाच्या लढाईत अनेक सामाजिक संस्था, विविध कंपन्या आणि व्यक्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत राज्य सरकारला आर्थिक मदत करत आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रूग्ण; सरकार कुणाचं याचा विचार न करता केंद्राने मोठी आर्थिक मदत द्यावी”

मोदी सरकारनं लॉकडाऊन केला… उद्धव ठाकरेंनी आधार दिला…; ऐका थेट उसाच्या शेतातून कोरोनावरचं गीत

महत्वाच्या बातम्या-

राज्यात अडकलेल्या लोकांना गावी सोडण्यासाठी मोफत एसटी सेवा देणार- विजय वडेट्टिवार

’17 मेनंतर काय करणार?’; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल

…म्हणून महसूल सोडा आणि सामाजिक अंगाने विचार करा- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More