बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांचा ‘तो’ व्हिडीओ केला ट्विट, पाहा व्हिडीओ

मुंबई | आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचा इशारा दिला होता. राणा दाम्पत्यांच्या इशाऱ्यानंतर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. यानंतर राणा दाम्पत्यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतलं.

राणा दाम्पत्यांना ताब्यात घेतल्यापासून मुंबई पोलिसांकडून त्यांना वाईट वागणूक मिळत आहे, असा गंभीर आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. या आरोपांवर आता मुंबई पोलीस आयुक्तांकडून थेट पुराव्यासह उत्तर देण्यात आलं आहे.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा पोलीस स्टेशनमध्ये चहा पितानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे भाजपकडून करण्यात येत असलेले सगळे आरोप मुंबई पोलीस आयुक्तांकडून खोडण्यात आले आहेत.

दरम्यान, राणा दाम्पत्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेला पहायला मिळत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

Gold Rate ! सोन्याच्या दरात काय बदल झाले, वाचा एका क्लिकवर

“त्यांना खाजवण्याची सवय आहे आणि त्यामुळे त्यांची चमडी फाटणार”

‘एवढी लुच्चागिरी तर फक्त…’, राऊतांच्या टीकेवर सोमय्यांचा पलटवार

मोठी बातमी! राणा दाम्पत्यांना न्यायालयाचा झटका

“एखादा माथेफिरू हल्ला झाला म्हणून स्वत:च्या ओठाला टोमॅटो सॉस लावून फिरत असेल तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More