कोपर्डीच्या गुन्हेगारांना फाशी की जन्मठेप? 29 नोव्हेंबरला निकाल

अहमदनगर | राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल 29 नोव्हेंबरला येणार आहे. अहमदनगर सत्र न्यायालयाने ही माहिती दिली. 

कोपर्डी खटल्यातील तिन्ही दोषींच्या शिक्षेची सुनावणी आज पूर्ण झाली. काल दोन आरोपींच्या तर आज एका आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद केला. 

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही आजच युक्तीवाद केला. त्यामुळे निकाल केव्हा लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. मात्र कोपर्डीच्या गुन्हेगारांना कोणतं शासन होणार यासाठी आता 29 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे.