बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”आमचा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास, ते आमचा मान ठेवतील”

मंबई | काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर आखिल भारतीय काॅंग्रेस पक्षाच्या सरचिटणीस रजनी पाटील यांना काॅंग्रेसने राज्यसभेची उमेदवारी दिली. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह 22 सप्टेंबर रोजी रजनी पाटील यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने रजनी पाटील यांच्याविरोधात संजय उपाध्यय यांना उमेदवारी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

महाराष्ट्राची पंरपरा राहिली आहे की, निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपने अर्ज मागे घ्यावा, ही विनंती आम्ही फडणवीस यांच्याकडे केली आहे. आम्हाला खात्री आहे की, आमच्या विनंतीला मान ठेवला जाईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. त्याचबरोबर संघटनेत चर्चा करून फडणवीस निर्णय घेतील असं फडणवीसांनी सांगितल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्यय यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानंतर भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काॅंग्रेसने फडणवीस यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, पुण्याच्या जहांगीर रूग्णालयात 16 मे रोजी काॅंग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे भाजप संजय उपाध्यय यांची उमेदवारी मागे घेतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील घोटाळे बाहेर काढणार म्हणणाऱ्या दरेकरांना अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“लोकांनी एकाचवेळी दोन ते तीन वेळा बटनं का दाबायची?”; राज ठाकरेंचा सवाल

कागलनंतर सोमय्यांच्या रडारवर पारनेर साखर कारखाना!

ओबीसी आरक्षणाबाबत धक्कादायक माहिती समोर!

मोठी बातमी! नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More